Join us

आरोग्य सेवा क्षेत्रासाठी राष्ट्रीय नियामकाची गरज

By admin | Updated: August 7, 2015 21:51 IST

आरोग्य सेवेपासून आजही सर्वसामान्य जनता दूर आहे. अशात शासकीय आरोग्य केंद्रांची दुरवस्था लक्षात घेता आरोग्य क्षेत्रासाठी एक राष्ट्रीय नियामक

नवी दिल्ली : आरोग्य सेवेपासून आजही सर्वसामान्य जनता दूर आहे. अशात शासकीय आरोग्य केंद्रांची दुरवस्था लक्षात घेता आरोग्य क्षेत्रासाठी एक राष्ट्रीय नियामक यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, असे स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे.पार्टनरशिप फॉर सेफ मेडिसन, हेल्दी यू फाऊंडेशन, कंझ्युमर आॅनलाईन फाऊंडेशन आणि श्री श्री आनंदमीय संघाने आरोग्य क्षेत्रासाठी एक नियामक संस्था स्थापन करण्यावर जोर दिला आहे.कंझ्युमर आॅनलाईन फाऊंडेशनचे संस्थापक बेजन मिश्रा यांनी सांगितले की, नियामक संस्था देशातील प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्थित करण्यासाठी खाजगी क्षेत्राची मदत घेऊ शकते.