Join us
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड.. शाळा

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

नाडेकर विद्यालय, नरखेड

नाडेकर विद्यालय, नरखेड
नरखेड : स्थानिक पोलीस स्टेशन व नाडेकर विद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे व त्यांचे सहकारी संजय इंगळे, विजय कुमरे, कुणाल आरगुडे यांनी तालुक्यातील विविध शाळांत वाहतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन केले. अपघात झाल्यास प्रथमोपचार कसा करावा, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी नाडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान प्राचार्य दिलीप चरपे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)