Join us  

जेट एअरवेजच्या बोर्डावरून दूर होण्यास नरेश गोयल तयार; अट मात्र कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:33 AM

आपल्या हिस्सेदारीतील समभागांना अबुधाबीस्थित ‘इतिहाद’ने योग्य किंमत दिल्यास जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून दूर होण्याची तयारी कंपनीचे प्रवर्तक नरेश गोयल यांनी दर्शविली आहे.

नवी दिल्ली : आपल्या हिस्सेदारीतील समभागांना अबुधाबीस्थित ‘इतिहाद’ने योग्य किंमत दिल्यास जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून दूर होण्याची तयारी कंपनीचे प्रवर्तक नरेश गोयल यांनी दर्शविली आहे. इतिहादने गेल्या आठवड्यात स्टेट बँक आॅफ इंडियाला (एसबीआय) सांगितले होते की, आपण जेटच्या समभागास प्रति समभाग १५0 रुपये देण्यासतयार आहोत. गोयल यांना ही किंमत समाधानकारके वाटलेली नाही.आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. यासंबंधीची चर्चा आता अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. वाटाघाटींशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, संचालक मंडळावरून पायउतार होणारच नाही, अशी ताठरभूमिका गोयल यांनी घेतलेली नाही. आपल्या हिस्सेदारीला योग्य किंमत यावी, याची ते वाट पाहत आहेत. त्यासाठी ते कठोरपणे वाटाघाटी करीत आहेत.सेबीच्या नियमानुसार, कंपनीचे अधिग्रहण झाल्यानंतर व्यवस्थापन बदलल्यास नव्या खरेदीदारास २५ टक्के अतिरिक्त समभाग खुल्या प्रस्तावाअंतर्गत लोकविक्रीसाठी खुले करावे लागतील. शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदार ते खरेदी करतील. खुल्या प्रस्तावातील समभागांची किंमत काय असावी, यासंबंधीही सेबीचे नियम आहेत. त्यासाठी अनेक मापदंड लावले गेले आहेत.>...तर जेटची एकूण किंमत १,८00 कोटी रुपयेस्पाइस जेटचे संस्थापक अजय सिंग यांनी २0१५ मध्ये कंपनीचे अधिग्रहण केले होते, तेव्हा त्यांना खुल्या प्रस्तावातून सूट देण्यात आली होती. तथापि, सूट देण्याचा निर्णय काही नियमांच्या अधीन राहूनच घेतला जातो. कंपनीनिहाय तो बदलू शकतो. सूत्रांनी सांगितले की, इतिहादने लावलेल्या १५0 रुपये प्रति समभाग या किमतीनुसार जेटची एकूण किंमत १,८00 कोटी रुपये होते. कर्जदात्या बँकांनी केलेले मूल्यांकन यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

टॅग्स :जेट एअरवेज