Join us
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये शेकडो गुंतवणुकदारांना गंडवले!

By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST

साई मार्केटींग कारनामा : कंपनीच्या कार्यालयास पोलिसांनी ठोकले सील

साई मार्केटींग कारनामा : कंपनीच्या कार्यालयास पोलिसांनी ठोकले सील
नंदुरबार : कमी गुंतवणुकीत जास्त मोबदला देण्याचे अमिष दाखवत येथील साई क्रेडीट ॲण्ड मार्केटींग या कंपनीने शेकडो जणांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे़ कंपनीच्या कार्यालयाची गुंतवणूकदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी तोडफोड करीत आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयाला सील केले आहे.
नंदुरबारात परदेशीपुरा भागात दोन वर्षांपासून साई क्रेडीट ॲण्ड मार्केटींग नामक कंपनी सुरू केली होती. कंपनीचे मुख्य कार्यालय पुणे येथे असल्याचे सांगण्यात येत होते. एजंटांमार्फत जास्तीत जास्त गुंतवणूकदार तयार करून लाखो रुपयांची उलाढाल कंपनीने सुरू केली होती. डेली कलेक्शन आणि एक रकमी भरणा या दोन योजनेतून शेकडो जणांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला नियमित परतावा मिळू लागल्याने कंपनीबाबत विश्वास निर्माण झाला. मात्र, तीन ते चार महिन्यांपासून कंपनीने परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने संशय निर्माण झाला होता़ अखेर शुक्रवारी परदेशी नावाचा संचालक गायब झाल्याचे समोर आले़ संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून आतील साहित्याची नासधूस केली. हाती लागेल ते पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. परदेशीपुरा भागात असलेल्या कंपनीच्या कार्यालयाला पोलिसांनी सील केेले आहे. पोलिसात नोंद करण्यात आली असून अद्याप फिर्याद दाखल करण्यास कुणीही पुढे न आल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)