Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्युच्युअल फंड व्यवहार ११ लाख कोटींच्या पार

By admin | Updated: January 9, 2015 23:38 IST

इक्विटी मार्केटने नोंदविलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या क्षेत्राकडे गुंतवणूक वाढली आणि या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत एकूण रकमेत ४.३३ टक्क्यांनी वाढ झाली.

मुंबई : भांडवली बाजारात सुरू असलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर आता म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पुन्हा गुंतवणूकदार सक्रिय झाल्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेने ११ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इक्विटी मार्केटने नोंदविलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या क्षेत्राकडे गुंतवणूक वाढली आणि या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत एकूण रकमेत ४.३३ टक्क्यांनी वाढ झाली.असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड इन इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आॅक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत फंडांकडील एकूण रक्कम ११ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. त्याआधीच्या जुलै-सप्टेंबर महिन्यात ही रक्कम १0 लाख ५९ हजार कोटी रुपये होती. या म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणात बदलला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजेच मे महिन्यानंतर हा मोठा बदल झालेला दिसून येत आहे. गुंतवणूकदार पुन्हा वित्तीय क्षेत्राकडे आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे. गुंतवणुकीवर मिळणारा चांगला परतावा गुंतवणूकदारांना पुन्हा इक्विटी, तसेच डेट मार्केटकडे आकर्षित करीत आहे. (प्रतिनिधी)एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडे सर्वाधिक म्हणजे १ लाख ५0 हजार कोटी रुपये असून, आपले सर्वोच्च स्थान कायम राखले आहे.आयसीआयसीआय प्र्रुडेन्शियल म्युच्युअल फंड दुसऱ्या क्रमांकावर असून, या फंडाकडे असलेली एकूण रक्कम १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.