Join us

मूर्तिजापूर ते काटेपूर्णा पायदळ वारी

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST

मूर्तिजापूर: नवरात्र उत्सवादरम्यान दरवर्षी येथील भाविक वैयक्तिकरित्या काटेपूर्णा येथील चंडिका देवीच्या दर्शनासाठी जात असतात. यावर्षी मात्र येथील भाविकांनी सामूहिकरित्या मूर्तिजापूर ते काटेपूर्णा पायदळ वारी केली. वारी समितीतर्फे रविवार २८ सप्टेंबर रोजी आयोजित या पायदळ वारीत येथील तब्बल १२०० भाविक सहभागी झाले होते. येथील शिवाजी चौकातून पहाटे ५ वाजता भजन मंडळासह ही वारी निघाली. अनेक ठिकाणी वारकर्‍यांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. चंडिका देवी संस्थानच्यावतीने दर्शनबारीची व्यवस्था शामुसेठ अग्रवाल यांनी केली. परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)01सीटीसीएल11