Join us

अपहृत जावयाचा खून झाल्याचे उघडकीस

By admin | Updated: September 5, 2014 23:28 IST

पंढरपुरातील घटना : कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला

पंढरपुरातील घटना : कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला
पंढरपूर : माहेरहून पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आठ झाली असून त्यात त्याची पत्नी आणि मेव्हण्याचाही समावेश आहे.
नितीन एकनाथ माळी (२३, रा. ता. हवेली, जि. पुणे) हा पत्नी प्रियंका हिला नेण्यासाठी तालुक्यातील भोसे येथे ७ ऑगस्ट रोजी आला होता. मात्र तो तेव्हापासून बेपत्ता होता. आपल्या मुलाचे सासरच्या लोकांनी अपहरण केल्याची तक्रार नितीनची आई मृद्रका माळीे यांनी करकंब पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी बंडु रामभाऊ गव्हाणे, द्वारकादास बंडु गव्हाणे, पोपट साहेबराव पवार, बिभीषण साहेबराव माळी, नितीन राजाभाऊ माळी, काशीबाई गव्हाणे, राधाबाई पवार यांच्यांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती़
वडुली (ता. टेभूर्णी) येथील उजनीच्या कॅनलमध्ये १ सप्टेंबर रोजी नितीनचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला़ मृतदेहाजवळ सापडलेले मतदान ओळखपत्र व अन्य कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली़ पोलिसांनी गुरुवारी प्रियंका व तिचा भाऊ नितीन यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशानी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
-----
अनैतिक संबधातून खून?
आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये सुनेचे तिच्या मामाशी अनैतिक संबध असल्याने आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप केला आहे़ मुक्ताबाई माणीक माळी ही फरार आहेत.