Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक संपली अन् बाहेर पडली मनसेची ब्लू प्रिंट नगरसेवक चकीत: उषा शेळके यांनी दिला घरचा अहेर

By admin | Updated: November 2, 2014 00:18 IST

नाशिक- गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता आणि टीका अशा दोन्ही भावनांना सामोरी गेलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट अखेर प्रसिध्द झाली परंतु नगरसेवकांच्या हाती पडली ती निवडणूक निकालानंतर! पालिकेच्या महासभेच्या वेळी राज ठाकरे यांचे हे व्हीजन डॉक्युमेंट हाती पडल्याने मनसेच्या नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले अनेक विरोधकांनी आता ही पुढिल निवडणूकीची तयारी का? अशी मनसे नगरसेवकांची हेटाळणी केली. अर्थात, महापालिकेत मनसेची सत्ता असून नागरी कामे होत नाही, या नागरिकांच्या भावना मनसेच्याच एका नगरसेवकाने व्यक्त केल्या आणि त्यामुळे निवडणूकीत फटका बसल्याचे विधान करून सार्‍यांनाच धक्का दिला.

नाशिक- गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता आणि टीका अशा दोन्ही भावनांना सामोरी गेलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट अखेर प्रसिध्द झाली परंतु नगरसेवकांच्या हाती पडली ती निवडणूक निकालानंतर! पालिकेच्या महासभेच्या वेळी राज ठाकरे यांचे हे व्हीजन डॉक्युमेंट हाती पडल्याने मनसेच्या नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले अनेक विरोधकांनी आता ही पुढिल निवडणूकीची तयारी का? अशी मनसे नगरसेवकांची हेटाळणी केली. अर्थात, महापालिकेत मनसेची सत्ता असून नागरी कामे होत नाही, या नागरिकांच्या भावना मनसेच्याच एका नगरसेवकाने व्यक्त केल्या आणि त्यामुळे निवडणूकीत फटका बसल्याचे विधान करून सार्‍यांनाच धक्का दिला.नाशिकमध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी विकासाची ब्ल्यु प्रिंट आपल्या हाती असल्याचा दावा केला होता. तथापि, ही ब्लु प्रिंट कधीही बाहेर पडली नसल्याने त्यावर वारंवार टीका झाली. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असल्याने नाशिकच्या ब्लू प्रिंटचा प्रश्नही वारंवार चर्चिला गेला. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे ब्लु प्रिंटच्या तयारीला लागले आणि हीच संधी साधून शिवसेनेने आपले व्हीजन डॉक्युमेंट अगोदरच सादर करून मनसेला मागे टाकले. त्यानंतर राज यांनी ब्लु प्रिंट प्रकाशीत केली परंतु त्याचवेळी युती आणि आघाडी तुटण्याच्या घटनेने संधी साधल्याने ही प्रिंट फारशी चर्चिली गेली नाही. निवडणूक प्रचारात राज यांनी ठिकठिकाणी आपल्या ब्ल्यु प्रिंटचा उल्लेख केला आणि ती वाचा असे आवाहन केले असले तरी ती कोणाच्याच हाती नव्हती. प्रचार संपला, निवडणूकीचा आणि मनसेचा निकाल लागला आणि आताही प्रिंट उपलब्ध झाली आहे. सभागृहात जाताना नगरसेवक आणि पत्रकारांना ही ब्ल्यु प्रिंट देण्यात आली. जेव्हा गरज होती तेव्हा प्रिंट सोडाच सीडीही नव्हती आणि आता दिवाळी संपल्यानंतर फटाके वाजवण्याचा प्रकार आहे.मनसेच्या अशाच घोळावर या पक्षाच्या नगरसेवक उषा शेळके यांनी महासभेत आसुड ओढले. नाशिकचा विकास झाला नाही, त्याचाच फटका बसल्याचा दावा शेळके यांनी केला. आपल्या सातपूर विभागात डेंग्युचे आठ ते रूग्ण आहेत. परंतु अधिकारी दाद देत नाही अशी तक्रार केली. मनसेच्या नगरसेवकांना काय बोलावे तेच सुचेना अशी अवस्था झाली.