मुंब्रा टोल सप्टेंबरपासून बंद
By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST
सप्टेंबरपासून मुंब्रा टोल बंद
मुंब्रा टोल सप्टेंबरपासून बंद
सप्टेंबरपासून मुंब्रा टोल बंदमुंबई : ठाणे-पनवेल मार्गावरील मुब्रा येथील टोलनाक्यावर टोलवसुली करण्यास मुदतवाढ देण्याची मेसर्स अटलांटा कंपनीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे़ त्यामुळे येत्या २१ सप्टेंबरपासून येथील टोलवसुली बंद होऊन, यामार्गे प्रवास करणार्या ठाणे व मुंबईकरांची यातून सुटका झाली आहे़या कंपनीला १९९९ मध्ये मुंब्रा बायपास बांधण्याचे काम बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर देण्यात आले़ त्याची मुदत सहा वर्षांची होती़ या कामात दोष आढळल्याने शासनाने कंपनीला रस्तादुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश दिले़ त्याचा आधार घेत कंपनीने टोलवसुलीची मुदत २४ वर्षे वाढवण्याची मागणी केली़ त्यास अनुकूल असा शेरा देत अभियंत्याने ही मागणी पुढील मंजुरीसाठी सरकारदरबारी पाठवली़ मात्र ही मुदतवाढ देण्यास शासनाने नकार दिला़याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली व मुदतवाढ देण्याची मागणी केली़ दरम्यान, अभियंत्याने मुदतवाढीसाठी केलेली शिफारस मान्य करणे हे शासनावर बंधनकारक नाही, असे ॲड़ दिनेश अडसुळे व ॲड़ दिनेश खैरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ ते ग्रा धरीत न्यायालयाने टोलवसुलीला मुदतवाढ देण्यास नकार दिला़