Join us

पर्यटकांसाठी मुंबई सर्वात महागडे शहर

By admin | Updated: September 3, 2015 21:57 IST

देशातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबई शहर पर्यटकांसाठी सर्वात महागडे शहर ठरू पाहत आहे. हॉटेल्स डॉट कॉमच्या एका पाहणीतून ही माहिती समोर आली आहे.

मुंबई : देशातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबई शहर पर्यटकांसाठी सर्वात महागडे शहर ठरू पाहत आहे. हॉटेल्स डॉट कॉमच्या एका पाहणीतून ही माहिती समोर आली आहे.मुंबईत या सहा महिन्यांत हॉटेल्सच्या दरात पाच टक्के वाढ झाली असून हॉटेल्सचे एका रात्रीसाठीचे सरासरी दर हे ८०९१ रुपये इतके आहेत. देशात इतर प्रमुख शहरात हॉटेल्सचे दर हे दोन टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, मुंबईत ही वाढ पाच टक्क्यांपर्यंत झाली आहे, हे विशेष. हॉटेल्स डॉट कॉमच्या अहवालानुसार मुंबईत २०१४ च्या पहिल्या सहामाहीत एका रात्रीसाठी हॉटेलचे दर हे सरासरी ७६९४ रुपये इतके होते. यंदा दिल्लीत हॉटेलच्या दरात तीन टक्क्यांनी कपात झाली आहे, हे विशेष. कोलकात्यात हॉटेलच्या दरात दोन टक्क्यांनी कपात झाली आहे. गतवर्षी कोलकात्यात हॉटेल्सचे दर एका रात्रीसाठी ६३६७ रुपये इतके होते. सध्या ते ६२६३ रुपये इतके झाले आहेत.