नवी दिल्ली : पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई सर्वात महागडे, तर चंदीगड सर्वात किफायतशीर शहर ठरले. सोमवारी येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाचा हा निष्कर्ष आहे. पर्यटन पोर्टल ‘ट्रीप अॅडव्हायझर’ने जून ते आॅगस्टदरम्यान तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी येणाऱ्या खर्चाची तुलना करून देशातील महागडी आणि किफायतशीर शहरे कोणती याचा निष्कर्ष काढला. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, हैदराबाद, जयपूर, कोलकाता व चंदीगड येथे दोन जणांच्या वास्तव्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले. यात तीन रात्रींसाठी फोर स्टार हॉटेल, दुपारचे व रात्रीचे जेवण व टॅक्सीच्या किरायाचा समावेश आहे.
पर्यटकांसाठी मुंबई सर्वात महागडी
By admin | Updated: August 4, 2015 23:10 IST