Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते महाबळेश्वर.. व्हाया धोम!

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

- ‘सी-प्लेन’चे धोम जलाशयात यशस्वी लँडिंग

- ‘सी-प्लेन’चे धोम जलाशयात यशस्वी लँडिंग
वाई : वाई तालुक्यातील धोम धरणाच्या जलाशयात ‘सी प्लेन’ने यशस्वीरीत्या लँडिंग केले. राज्य शासनाचे पर्यटन विकास महामंडळ व जलसंपदा विभागाच्या विशेष सहकार्याने पर्यटनवाढीसाठी या हवाई वाहतुकीची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे लवकरच मुंबई ते धोम धरण हवाई वाहतूक सुरू होऊन महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या हेतूने व सुखकर प्रवास आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ‘सी प्लेन’ची संकल्पना पुढे आली. हवेतून व पाण्यातून प्रवासी वाहतूक करणार्‍या ‘सी प्लेन’चा प्रारंभ काही दिवसांपूर्वीच मुंबईत करण्यात आला होता. पाचगणी-महाबळेश्वरला येणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पर्यटन महामंडळाने मुंबई ते धोम धरण ही सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बोरीवजवळ धोम धरणाच्या जलाशयात ‘सी प्लेन’ने यशस्वीरीत्या लॅँडिंग केले. (प्रतिनिधी)