Join us  

मुंबई ठरले जगातील १२ वे सर्वाधिक श्रीमंत शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 4:50 AM

नाईट फ्रंट या संस्थेत जारी केलेल्या जागतिक पातळीवरील संपत्तीविषयक अहवालानुसार मुंबई शहर जगातील १२ व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले आहे.

मुंबई : नाईट फ्रंट या संस्थेत जारी केलेल्या जागतिक पातळीवरील संपत्तीविषयक अहवालानुसार मुंबई शहर जगातील १२ व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले आहे. २०१७ च्या अहवालात मुंबई १८ व्या स्थानी होती. ब्रेक्झिटच्या चिंता दूर सारून लंडन शहर पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत शहर ठरले आहे. आधी हे स्थान न्यूयॉर्ककडे होते.अब्जाधीशांची संख्या वाढण्याच्या बाबतीत भारत ११६ टक्के वृद्धीसह जगात अव्वलस्थानी आहे. २०१३ मध्ये भारतात फक्त ५५ अब्जाधीश होते. २०१८ मध्ये ही संख्या ११९ झाली आहे. लक्षाधीशांची संख्या २०१३ मध्ये २,५१,००० होती. ती २०१८ मध्ये ३,२६,०५२ झाली आहे. आशियातील अब्जाधीशांच्या संख्येत २७ टक्के वाढ झाली आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपला आशियाने मागे टाकले आहे.आंतरराष्ट्रीन मानकांनुसार, ज्यांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य किमान २२५ कोटी आहे त्यांना अतिश्रीमंत लक्षाधीश (अल्ट्रा मिलेनिअर) म्हटले जाते. ज्यांच्या संपत्तीचे किमान मूल्य ७,२०० कोटी आहे त्यांना अब्जाधीश (बिलेनिअर) म्हटले जाते. त्यांच्या संपत्तीचे मूल्य ७.२ कोटी आहे त्यांना लक्षाधीश (मिलेनिअर) म्हटले जाते.मुंबईत भारतातील सर्वाधिक लक्षाधीश आणि अतिश्रीमंत लक्षाधीश राहतात. अब्जाधीशांच्या बाबतीत मात्र बंगळुरू आघाडीवर असल्याचे दिसते. भारतात १,९४७ अतिश्रीमंत लक्षाधीश आहेत. त्यातील ७९७ जण मुंबईत, २११ जण दिल्लीत आणि ९८ जण बंगळुरूत आहेत. भारतात ११९ अब्जाधीश असून, बंगळुरूत ३३, मुंबईत १९ आणि दिल्लीत ८ अब्जाधीश आहेत.>मुंबईतील मालमत्ताहीमहागमुंबई हे जगातील १६ व्या क्रमांकाचे महागडे निवासी मालमत्तांचा बाजार असलेले शहर ठरले आहे.59 देशांतील श्रीमंतांचे हे सर्वेक्षण आहे. यातील पहिल्या १० देशांत८ देश आशियाई आहेत. पुढील ५ वर्षात ३९ टक्के वृद्धीसह भारत आघाडीवरराहील असा अंदाज आहे.