Join us  

मुकेश अंबानींच्या कार्यकाळात 5 वर्षांची वाढ, मिळणार भरमसाट पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 8:39 PM

रिलायन्स कंपनीच्या चेअरमनपदी मुकेश अंबानींची पुढील पाच वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली आहे. कंपनीच्या शेअरधारकांनी मुकेश अंबानींचा कार्यकाळ 5 वर्षे वाढविण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली - रिलायन्स कंपनीच्या चेअरमनपदी मुकेश अंबानींची पुढील पाच वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली आहे. कंपनीच्या शेअरधारकांनी मुकेश अंबानींचा कार्यकाळ 5 वर्षे वाढविण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. यासाठी त्यांना वर्षाला 4.17 कोटी रुपये पगार देण्यात येणार आहे. शिवाय इतर भत्तेही मिळणार आहेत. 61 वर्षीय मुकेश अंबानी 1977 पासून कंपनीच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये कार्यरत आहेत. सन 2002 साली रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर अंबानी यांच्याकडे चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

रिलायन्स कंपनीच्या मुंबईतील 41 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानींचा कार्यकाळ 5 वर्षे वाढविण्यास मंजुरी देण्यात आली. एप्रिल 2019 मध्ये मुकेश अंबानींचा कार्यकाळ संपणार होता. मात्र, शेअरधारकांकडून घेण्यात आलेल्या मतदानापैकी 98.5 टक्के मते मुकेश अंबानींच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील 5 वर्षांसाठी मुकेश अंबानीची चेअरमनपदी निवड झाली. याबाबत रिलायन्सकडून शेअर बाजारातही माहिती देण्यात आली आहे. या निवडीमुळे मुकेश यांना कंपनीकडून सर्वच प्रकारचे लाभ मिळणार आहेत. त्यामध्ये 4.17 कोटी रुपयांचे वेतन आणि 59 लाख रुपयांचे इतर भत्ते अंबानींना देण्यात येणार आहेत. यासह सेवानिवृत्तीचा लाभही मिळणार आहे. तसेच अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचा खर्चही कंपनीतर्फेच करण्यात येईल. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्समुकेशव्यवसाय