Join us  

होय, भारतात मंदी; मुकेश अंबानींची सौदीत कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:28 PM

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी भारतात मंदी असल्याचं अप्रत्यक्षरीत्या मान्य केलेलं आहे.

रियाधः रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी भारतात मंदी असल्याचं अप्रत्यक्षरीत्या मान्य केलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुस्तीच्या काळातून जातेय. परंतु ही स्थिती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. सरकार लवकरच या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य पावलं उचलेल, असंही मुकेश अंबानींनी सांगितलं. येत्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी असेल. सौदी अरबमधल्या रियाद शहरात आयोजित करण्यात आलेल्या फ्यूचर इनवेस्टमेंट इनिशिएटिव्ह'ला संबोधित करताना मुकेश अंबानींनी हे विधान केलं आहे. 29 ते 31 ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्य वक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या कार्यक्रमात मुकेश अंबानींसह दिग्गज भारतीय उद्योगपती सहभागी झाले आहेत. मुकेश अंबानींनी या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारतीय अर्थव्यवस्थेत थोडी सुस्ती नक्कीच आली आहे. परंतु ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सुधारणा केल्या गेल्या आहेत. त्याचा परिणाम लवकरच समोर येईल. येत्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची परिस्थिती बदललेली असेल, असा विश्वासही मुकेश अंबानींनी व्यक्त केला आहे.  यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सौदीचे किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद आणि त्याचा मुलगा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. सौदी अरब आणि भारताचं नेतृत्व दोन्ही देशांना प्रगतिपथावर नेणारं आहे. सौदी अरबनं गेल्या 2 - 3 वर्षात मोठा बदल पाहिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात घसरण झालेली पाहायला मिळालेली आहे. पण लवकरच ही परिस्थिती बदलेल, असा विश्वासही अंबानींनी व्यक्त केला आहे. तर अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारनं कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केलेली आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानी