Join us  

मुकेश अंबानी मालामाल; Jio Cinema वर फ्री IPL दाखवून केली बंपर कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 5:20 PM

JioCinema ने Disney+ Hotstar अॅपलाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले.

यावर्षी IPL 2024 ची धमाकेदार सुरुवात झाली. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात थरार पाहायला मिळतोय. JioCinema वर IPLचे मोफत प्रक्षेपण सुरू आहे. याच मोफत प्रक्षेपणातून मुकेश अंबानी बंपर करमाई करत आहेत. कमाईच्या बाबतीत अंबानींच्या JioCinema ने Disney Plus Hotstar लाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, पूर्वी Disney Plus Hotstar ॲपवर लाईव्ह सामने दाखवले जायचे, ज्यासाठी युजरला 1499 रुपये मोजावे लागायचे. 

Disney Plus Hotstar ने नेहमीच ॲपच्या कमाईसाठी सबस्क्रिप्शनवर मॉडेलवर भर दिला, तर JioCinema ॲप सुरुवातीपासून ग्राहकांना मोफत कंटेट दाखवत आहे. मोफत मिळत असल्यामुळे युजर JioCinema ॲपकडे वळला. दररोज लाखो-करोडो युजर JioCinema वर लाईव्ह मॅच पाहत आहेत. त्यामुळे कंपनीनेही अॅपवर जाहिरात दाखवण्याचा दर जास्त ठेवलाय. या जाहिरातीच्या माध्यमातूनच जिओ डिझ्नीपेक्षा जास्त कमाई करत आहे.

IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यात JioCinema ॲपवरील दर्शक संख्येत जोरदार वाढ नोंदवण्यात आली. जवळपास 12 कोटी रसिकांनी JioCinema वर लाईव्ह सामना पाहिला. हा आकडा Disney + Hotstar वर IPL 2022 च्या उद्घाटन सामना पाहणाऱ्या 8 कोटी दर्शकांपेक्षा अधिक आहे. याचे कारण म्हणजे युजरला जिओवर मोफत सामना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे, चेन्नईच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला, तेव्हा दर्शकांची संख्या 24 कोटींवर पोहोचली होती. हा एक रेकॉर्ड आहे.

Disney+ Hotstar ने IPL 2022 मध्ये सबस्क्रिप्शनद्वारे 1200 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर JioCinema ने IPL 2023 मध्ये IPL मोफत दाखवून जाहिरातीतून 3239 कोटी कमावले. 

टॅग्स :मुकेश अंबानीव्यवसायजिओआयपीएल २०२४