Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानी झोपेतही 4 कोटी कमावतात

By admin | Updated: October 29, 2016 11:21 IST

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी झोपेत असतानाही 4 कोटी रुपयांची कमाई करतात, अशी माहिती फोर्ब्स मॅगझिनने दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी झोपेत असतानाही 4 कोटी रुपयांची कमाई करतात, अशी माहिती फोर्ब्स मॅगझिनने दिली आहे.  धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर फोर्ब्सने कॉर्पोरेट, क्रिकेट, बॉलिवूडमधील श्रीमंतांची यादी आणि त्यांच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार सलग नवव्या वेळा मुकेश अंबानी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
 
त्यांची एकूण मालमत्ता 22.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.52 लाख कोटी रुपये एवढी आहे. त्यांचा महिन्याचा पगार 39 कोटी रुपये आहे. मुकेश अंबानी सात तास झोपतात. त्यानुसार त्यांच्या एकूण मालमत्तेचा हिशेब पाहिला तर झोपेतही ते 4 कोटी 37 लाख रुपये कमावतात, अशी माहिती फोर्ब्सने दिली आहे.
 
तर टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने या वर्षी 207 कोटी रुपये कमावले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्तीनंतर 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे. तर विराट कोहलीने वर्षभरात 192 कोटी रुपये कमावले आहेत. 
 
 
कॉमेडी किंग कपिल शर्माने 60 कोटी कमावले आहेत. तर अभिनेत्री दीपिका पडुकोणने 67 कोटी रुपये कमावले असून जगभरातल्या सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 10 अभिनेत्रींमध्येही दीपिका दहाव्या क्रमांकावर आहेत.