Join us
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अभियंत्यास दहा हजार रुपये दंड

By admin | Updated: September 22, 2015 22:09 IST

शेतजमिनीत विहिरीवरील वीजजोडसंदर्भात ३० दिवसांच्या विहित मुदतीत माहिती न देता विलंब केल्याप्रकरणी महावितरणचे तत्कालीन

संगमनेर (अहमदनगर) : शेतजमिनीत विहिरीवरील वीजजोडसंदर्भात ३० दिवसांच्या विहित मुदतीत माहिती न देता विलंब केल्याप्रकरणी महावितरणचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता प्रवीण साळी यांना १० हजार रुपयांचा दंड राज्य माहिती आयुक्त पी. डब्ल्यू. पाटील यांनी ठोठावला आहे. तालुक्यातील नान्नज दुमाला येथील कैलास मोकळ यांनी शेतजमिनीतील विहिरीवर वीजजोड घेण्यासाठी महावितरणकडे अर्ज केला होता; परंतु त्यांना वीजजोड मिळाली नाही. यासंबंधी मोकळ यांनी २२ मे २०१४ रोजी माहिती अधिकारात महावितरणकडे माहिती मागितली; परंतु तत्कालीन उपकार्यकारी अभियंता प्रवीण साळी यांनी त्यांना विहित ३० दिवसांच्या मुदतीत माहिती दिली नाही. मोकळ यांनी प्रथम अपील करूनही त्यांना माहिती मिळाली नाही. म्हणून मोकळ यांनी थेट राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात तक्रार दाखल केली. त्याची सुनावणी होऊन मुदतीत माहिती न दिल्याबद्दल साळी यांना १० हजार रुपयांचा दंड माहिती आयुक्त पाटील यांनी ठोठावला. सुनावणीस कार्यकारी अभियंता अशोक सावंत, उपकार्यकारी अभियंता हेमंतकुमार चौरे उपस्थित होते. दंडाची रक्कम साळी यांच्या दरमहा वेतनातून समान दोन हप्त्यांत वसूल करावी, तसेच या निर्णयाच्या पंधरा दिवसात मोकळ यांना माहिती देण्याचे आदेश चौरे यांना दिले. (प्रतिनिधी)