Join us

मोटो E4 प्लस स्मार्टफोन लवकरच भारतात !

By admin | Updated: July 5, 2017 16:49 IST

लेनोव्हो ब्रॅंड असलेल्या मोटोचा नवीन स्मार्टफोन मोटो E4 प्लस लवकरच भारतात येणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.05 - सध्या नव-नवीन स्मार्टफोन भारतीय मोबाईल मार्केटमध्ये येताना दिसत आहेत. लेनोव्हो ब्रॅंड असलेल्या मोटोचा नवीन स्मार्टफोन मोटो E4 प्लस लवकरच भारतात येणार आहे.
येत्या 12 जुलै रोजी मोटो ई- 4 प्लस भारतात लॉंच करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मोटोने एक व्हिडिओ जारी केला असून यामध्ये लवकरच मोटो E4 प्लस येणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान,  मोटो E4 या स्मार्टफोनची भारतातील ऑफलाइन किंमत 8,999 इतकी आहे.
मात्र, मोटो E4 प्लस या स्मार्टफोनची अद्याप किंमत जाहीर करण्यात आली नसून मोटो E4 या स्मार्टफोनपेक्षा नक्कीच जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या जून महिन्यात जगभरातील मोबाईल मार्केटमध्ये मोटो E4 आणि मोटो E4 प्लस हा स्मार्टफोन कंपनीकडून लॉंच करण्यात आला होता.  
 
(स्मार्टफोन बॅटरीसाठी घातक ठरतात "हे" 10 अॅप)
(जिओचा नवा धमाका, 1734 रुपयांत येणार जिओचा 4जी स्मार्टफोन)
 
मोटो E4 प्लस या स्मार्टफोनची खासियत...
- 5.5 इंच एचडी डिस्प्ले (720x1280 pixels)
- 2 जीबी रॅम 16 जीबी आणि 32 जीबी इंटरनल मेमरी व्हेरिएंट.
- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा.
- 5000 mAh बॅटरी
- मोटो E4 ची किंमत 8,999 रुपये तर मोटो E4 प्लसची किंमत 11600 असण्याची शक्यता.