Join us

‘मुंबई हाय’जवळ आणखी तेल, गॅस, ओएनजीसीची माहिती; साठे सापडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:40 IST

सरकारी मालकीची तेल कंपनी ‘आॅइल अ‍ॅण्ड गॅस कॉर्प’ने (ओएनजीसी) अरबी समुद्रातील मुंबई हाय अपतटीय क्षेत्राच्या पश्चिमेला २० दशलक्ष टन तेल आणि नैसर्गिक वायूचा नवा साठा शोधला आहे.

नवी दिल्ली : सरकारी मालकीची तेल कंपनी ‘आॅइल अ‍ॅण्ड गॅस कॉर्प’ने (ओएनजीसी) अरबी समुद्रातील मुंबई हाय अपतटीय क्षेत्राच्या पश्चिमेला २० दशलक्ष टन तेल आणि नैसर्गिक वायूचा नवा साठा शोधला आहे.मुंबई हायमध्ये वर्षाला ९ ते १० दशलक्ष टन तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओएनजीसीने यंदाच्या जुलैमध्ये मुंबई हायच्या पश्चिमेला नवा हायड्रोकार्बन साठा शोधला आहे. डब्ल्यूओ २४-२ तेल विहिरीत हा साठा सापडला आहे. ओएनजीसीने तेल विहिरीत नऊ विभाग तपासले. यापैकी एकाच विभागात प्रतिदिन ३ हजार बॅरल तेल निघाले. आणखी खोलीवर तेल आणि गॅस आढळून आला आहे.>शेअर लगेच वधारलाभारताच्या दृष्टीकोनातून हा फार मोठा शोध आहे. अरबी समुद्रात मुंबई हाय क्षेत्राच्या बाहेर हा साठा सापडल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या तेलसाठ्याचे वृत्त येताच शेअर बाजारात ओएनजीसीचे समभाग वाढून १७०.९ रुपयांवर गेले. हा तीन महिन्यांचा उच्चांक ठरला.