Join us  

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना भारतासाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 9:32 AM

कोरोनाची दुसरी लाट आली असताना मूडीजनं अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक अंदाज

नवी दिल्ली: देशात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या वेगानं अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. भारतानं कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकलं आहे. आता केवळ अमेरिकाच भारताच्या पुढे आहे. गेल्या आठवडाभरापासून देशात कोरोनाचे १ लाखहून अधिक रुग्ण सापडत आहेत. देशात कोरोनाची दुसरी आणि भीषण लाट आलेली असताना आर्थिक आघाडीवरून दिलासादायक बातमी आहे....तर तुम्हीच माझ्या जागी कोविड युनिटमध्ये जा; डॉक्टरच्या ट्विटनं सारेच हेलावलेवित्त क्षेत्रातील दिग्गज संस्था असलेल्या मूडीजनं (Moody's) भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल दिलासादायक भाकीत केलं आहे. 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. मात्र तरीही मागील वर्षातल्या आर्थिक घडामोडींच्या तुलनेत जीडीपी वाढीचा वेग दोन आकडी असेल,' असा अंदाज मूडीजनं व्यक्त केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम यावर्षीदेखील दिसेल, असंही मूडीजनं पुढे म्हटलं आहे.कोरोनाचा मुक्काम दीर्घकाळ राहणार, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचे प्रतिपादनदेशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाची दुसरी लाट गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक भीषण आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्याऐवजी लहान-लहान कंटेन्मेंट झोन तयार करण्यात यावे, असा सल्ला मूडीजनं दिला आहे. लहान-लहान कंटेन्मेंट झोन तयार केले गेले, तर अर्थव्यवस्थेला बसणारा फटका गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असेल, असं मूडीजनं म्हटलं आहे.भारतातील कोरोना मृत्यूदर कमी आहे. याशिवाय तरुण लोकसंख्या जास्त असल्यानं कोरोना संकटाचा सामना करताना भारताला फायदा होईल. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. त्या तुलनेत यंदा होणारं नुकसान कमी असेल. जीडीपी वाढीचा वेग दुहेरी आकड्यात असेल, असा अंदाज मूडीजनं वर्तवला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या