Join us  

मोदी सरकारनं दिलं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; MSPमध्ये केली 'एवढी' वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:21 PM

दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्लीः दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज शेतकऱ्यांना दिलासा दिला असून, मोदी कॅबिनेटच्या बैठकीत रब्बी पिकांसाठी किमान आधार मूल्यात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किमान आधार मूल्यात 85 रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाच्या पिकाचं आधार मूल्य 1840 रुपयांवरून वाढवून 1925 रुपये करण्यात आले आहे. या किमान आधार मूल्यात 85 रुपयांची वाढ केली आहे. सरकारवर अतिरिक्त 3 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. देशात ऑक्टोबर ते मार्चदरम्यान येणाऱ्या सर्वच पिकांना रब्बी हंगामातील पीक समजलं जातं. ऑक्टोबरला जेव्हा पाऊस परतीच्या प्रवासाला लागतो, तेव्हा या पिकांची पेरणी केली जाते. मार्च आणि एप्रिलदरम्यान या पिकांची कापणी केली जाते. यादरम्यान पिकांसाठी कमी पाण्याची आवश्यकता असते.