गोरक्षण रोडवर मोबाईल टॉवरला सील
By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST
अकोला: मनपाच्या परवानगीविना मोबाईल टॉवर उभारण्याचे काम दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी हाणून पाडले. गोरक्षण रोडवरील नित्यानंद नगरस्थित साई मंगल कार्यालयावरील एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरला सील लावण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.
गोरक्षण रोडवर मोबाईल टॉवरला सील
अकोला: मनपाच्या परवानगीविना मोबाईल टॉवर उभारण्याचे काम दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी हाणून पाडले. गोरक्षण रोडवरील नित्यानंद नगरस्थित साई मंगल कार्यालयावरील एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरला सील लावण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.मोबाईल टॉवरची उभारणी करण्यासाठी मनपाच्या परवानगीची आवश्यकता असताना, विनापरवानगी टॉवर उभारण्याचे काम सुरू असल्याचा प्रकार मनपा अधिकार्यांच्या लक्षात आला. याविषयी कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावर दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, सहाय्यक कर अधीक्षक विठ्ठल देवकते, सईद अहमद, कर वसुली विभागाचे सूर्यप्रकाश गावंडे, भास्कर व्यवहारे यांनी साई मंगल कार्यालयावरील कंपनीच्या टॉवरला सील लावले.