लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागात मोबाइल कनेक्टिव्हिटी वाईट असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांना पत्र लिहिले आहे. सिन्हा यांना लिहिलेल्या पत्रात प्रभू यांनी सुविधातील अडचणी, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि पाऊस व वादळानंतर सेवेत येणारे अडथळे यांचा उल्लेख केला आहे.नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) आणि बेस ट्रान्सिवर स्टेशनसह (बीटीएस) पायाभूत सुविधांचाही उल्लेख केला आहे. या पत्रात प्रभू यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरी आणि दुर्गम भागात मोबाइल संपर्क यंत्रणा खूपच खराब आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. या भागात अतिरिक्त सुविधा देण्यात याव्यात आणि सध्याच्या त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणीही प्रभू यांनी केली आहे.
कोकणातील मोबाइल सेवा वाईट : प्रभू
By admin | Updated: July 15, 2017 00:04 IST