Join us  

Google Pay वरून Mobile Recharge केल्यास होणार मोठी कमाई; करा फक्त ‘इतकंच’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 12:55 PM

Google Pay UPI: Google Pay आपल्या युझर्सना कमाईची संधी देत आहे.

तंत्रज्ञानानं लोकांना कमाईचं साधनही मिळवून दिलं आहे. याचमुळे अनेकजण आज घरात बसूनही लाखो रुपये कमवत आहेत. इतकंच नाही तर आता मोबाईल रिचार्ज करूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. Google Pay सध्या युझर्सना कमाईची संधीही देत आहे. परंतु याद्वारे कमाई करताना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे.

पहिले समजून घेऊ Google Pay कमाई कसं करतं. भारतात काही वर्षांपूर्वी युपीआयद्वारे देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात वाढली. युपीआयद्वारे पैशांची देवाणघेवाण केल्यास कंपन्यांना त्याचं कमिशन मिळतं आणि म्हणूनच कंपन्या ग्राहकांना ही सेवा मोफत देतात.

रिचार्जवर कमाईतुम्ही Google Pay वापरून रिचार्ज करता तेव्हा, कंपनीला त्या बदल्यात नेटवर्क प्रदात्याकडून कमिशन मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही Google Pay वापरून Jio चे कोणतेही रिचार्ज केल्यास Jio ही कंपनी Google Pay ला कमिशन देईल. आता गुगल पे दुकानदारांना व्यवसाय करण्याचा पर्याय देत आहे. म्हणजेच जर दुकानदारांनी गुगल पे वापरून लोकांचे मोबाईल रिचार्ज केले तर कमिशनचा काही भाग त्यांनाही दिला जाईल.

गुगल पेची बाजारपेठ आधीच मोठी आहे. अहवालानुसार, UPI मार्केटचा 40 टक्के भाग Google Pay ने व्यापला आहे. म्हणजेच दैनंदिन UPI ​​व्यवहारापैकी 40 टक्के व्यवहार Google Pay द्वारे केले जातात. वास्तविक Google Pay हे ब्रोकर अॅप आहे जे अगदी ब्रोकरसारखेच काम करते. त्याचा संपूर्ण नफा कमिशनवर अवलंबून असतो. तुम्ही गुगल पे बिझनेस घेतल्यास, तुम्हाला कमिशनचा काही भाग देखील मिळू शकतो.

टॅग्स :गुगल पेव्यवसाय