नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट कंपनी मोबिविकने राज्य वीज बोर्डासह १२ वीज प्रकल्पांशी बिल पेमेंटसाठी एक करार केला आहे. कंपनीने सांगितले की, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, राजस्थान, दमण आणि दिव येथील राज्य वीज बोर्डाशी हा करार केला आहे. मोबिविकचे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) मृणाल सिन्हा यांनी सांगितले की, मोबिविक आता देशातील २५ वीज डिस्कॉमला बिल पेमेंटसाठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीच्या विस्ताराच्या दृष्टीने हे पाऊल टाकण्यात आले आहे. या राज्यातील ग्राहक आता मोबिविकच्या अॅपवरून किंवा वेबसाइटवरून वीज बिल भरू शकतील. दरम्यान, ही कंपनी यापूर्वीपासूनच सीईएससी, रिलायन्स एनर्जी, बीएसईएस राजधानी, बीएसईएस यमुना, टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्यूशन लिमिटेड आणि छत्तीसगढ इलेक्टीसिटी बोर्ड यांना बिल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘मोबिविक’चे ‘मोअर दॅन अ वॉलेट’
By admin | Updated: August 31, 2016 04:31 IST