Join us

सेन्सेक्समध्ये अल्पशी वाढ

By admin | Updated: January 19, 2017 04:50 IST

गुंतवणूकदार खरेदीकडे वळल्यामुळे बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २२ अंकांनी वाढला.

मुंबई : गुंतवणूकदार खरेदीकडे वळल्यामुळे बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २२ अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९ अंकांनी वाढून ८,४00 अंकांच्या वर बंद झाला.अन्य आशियाई बाजारातील तेजीमुळे सत्राच्या बहुतांश काळात निर्देशांक सकारात्मक टापूत राहिले. युरोपातही तेजी प्रवाही असल्याचे दिसून आले. नफा वसुलीमुळे निर्देशांकाची वाढ मर्यादित झाली. दिवसभर रुपया घसरणीला लागलेला होता. त्याचा फटकाही शेअर बाजाराच्या निर्देशांकांना बसला, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २१.९८ अंकांनी वाढून २७,२५७.६४ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा निफ्टी १९.00 अंकांनी वाढून ८,४१७.00 अंकांवर बंद झाला.