Join us

मिल्खा : सीडीसाठी

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST


..आता ऑलिम्पिक पदक हेच स्वप्न : मिल्खा

मडगाव : सध्या आपण 85 वर्षांचे आहोत. वय झालेले आहे. ही दुनिया कधी सोडून जाणार याचा नेम नाही. मात्र, जगाचा निरोप घेण्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये भारतीय अँथलिटने पदकाला गवसणी घातलेले बघायचे आहे, असे उद्गार ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांनी काढले. जमैकासारखा देश क्रीडा क्षेत्रात दबदबा निर्माण करू शकतो तर भारत का नाही, असाही प्रo्न त्यांनी केला. 120 कोटींच्या देशात दुसरा मिल्खा सिंग मिळू शकला नाही याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. चौगुले महाविद्यालयाच्या पाचव्या वार्षिक स्थापना दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी जीवनपट उलगडला. कठोर मेहनत करा. यश मिळेल, हा संदेशही त्यांनी दिला.
‘फ्लाइंग सिख’ ही पाकिस्तानने दिलेली पदवी असल्याची माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानचा अव्वल धावपटू अब्दुल खालीद यांना आशिया स्पर्धेत हरविल्यानंतर पाकिस्तानने तेथील धावण्याच्या स्पर्धेचे निमंत्रण दिले होते. मात्र, मी ते नाकारले. मात्र, पंतप्रधान पंडित नेहरूयांच्या सांगण्यावरून आपण तेथे गेलो होतो. साठ हजार प्रेक्षकांनी मैदानावर गर्दी केली होती. त्यात बुरखाधारी महिलाही होत्या. पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल याकुबही उपस्थित होते. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तेथे काही मौलवी येऊन खालीद यांना आशीर्वाद देऊ लागले. आपल्याला उर्दू भाषा अवगत असल्याने या मौलवींची भाषा मला कळली. त्यांना त्यांच्याच शब्दांत समज दिल्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेत आपण प्रथम क्रमांक मिळवला, तर भारताचाच मख्खन सिंग यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करताना पाकिस्तानच्या खालीद यांना चक्क तिसर्‍या स्थानी फेकले. प्रेक्षकांनी मी मैदानावर फेरी मारावी, असा घोषा लावला. आपण ती फेरी पूर्ण केली असता, बुरखाधारी महिलांनीही बुरखा काढून मला अभिवादन केले, तेव्हा जनरल याकुब यांनी तुम्ही धावत नाही तर उडत जाता, असे उद्गार काढत ‘फ्लाइंग सिख’ उपाधीने गौरविले होते, अशी आठवण मिल्खा सिंग यांनी सांगितली. मिल्खा सिंग यांनी आपल्या भाषणापूर्वी चौगुले महाविद्यालयाचा फेरफटका मारताना मैदानी सुविधांचीही पाहणी केली.


चौकट
ध्यानचंदच ‘भारतरत्न’चा पहिला मानकरी हवा होता
हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांनाच प्रथम भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे होता, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत आपण असे म्हटल्यावर पत्रकारांनी तुमच्याबद्दल काय, असा प्रतिसवाल केला होता. त्या वेळी मिल्खा सिंग तर भारताचे रत्न आहे, असे उत्तर दिले होते याचीही आठवण काढली.