Join us

सोन्याचा भावात किरकोळ घसरण

By admin | Updated: August 6, 2014 02:18 IST

सध्याच्या उच्च पातळीवर मागणीचे पाठबळ कमी झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सलग चार दिवसांच्या तेजीनंतर सोमवारी सोन्याचा भाव गडगडला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीच्या पाश्र्वभूमीवर सध्याच्या उच्च पातळीवर मागणीचे पाठबळ कमी झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सलग चार दिवसांच्या तेजीनंतर सोमवारी सोन्याचा भाव गडगडला. सोन्याचा भाव 135 रुपयांनी घटून 28,39क् रुपये प्रति दहाग्रॅम झाला. दुसरीकडे मर्यादित मागणीमुळे चांदीचा भाव 45,क्क्क् रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कमजोर जागतिक संकेतांदरम्यान उच्च पातळीवर मागणी घटल्याने सोन्याचा भाव पडला. चांदीचा भाव मात्र, मर्यादित व्यवहारांमुळे स्थिर राहिला.
 दिल्लीत 99.9  टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 135 रुपयांच्या घसरणीसह 28,39क् रुपये  प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव रुपयांनी कमी होऊन 24,7क्क् रुपयांवर आला.(लोकमत न्यूज नेटवर्क)