Join us  

कल बदलल्याने मिडकॅप, स्मॉलकॅपची चमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 11:29 AM

काहीशा नकारात्मक वातावरणामुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टीमध्ये काही प्रमाणात घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांनी आपला कल आता स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांकडे वळविलेला दिसून येत आहे.

- प्रसाद गो. जोशी

काहीशा नकारात्मक वातावरणामुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टीमध्ये काही प्रमाणात घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांनी आपला कल आता स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांकडे वळविलेला दिसून येत आहे. त्यामुळेच प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली असतानाही क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजार काहीसा खाली येऊन खुला झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ५३,१०३.४२ अंशांपर्यंत वर गेला. त्यानंतर विक्रीचा मारा झाल्याने हा निर्देशांक ५१,८०२.७३ अंशांपर्यंत खाली आला.  

गुंतवणूकदारांचे वाढले ३१ लाख कोटी n शेअर बाजारात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांच्या भांडवलामध्ये ३१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३०७७.६९ अंश म्हणजेच ६.२१ टक्क्यांनी वाढला आहे.n गुंतवणूकदारांनी केलेल्या सकारात्मक व्यवहारांमुळे मुंबई शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये चार महिन्यांमध्ये ३१,१८,३९४.३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांच्या हाती असलेला पैसा आणि धोरणामधील सातत्य यामुळे बाजारामध्ये मोठी गुंतवणूक झालेली दिसून आली. परिणामी बाजार वाढत आहे. 

n कंपन्यांचे तिमाही निकालाचे आकडे आणि रिझर्व्ह बँकेच्या व्याजदराच्या घोषणेकडे आगामी सप्ताहामध्ये बाजाराचे लक्ष राहणार आहे. त्यावरच येत्या सप्ताहामध्ये बाजाराची दिशा ठरणार आहे. 

गतसप्ताहातील स्थितीनिर्देशांक    बंद मूल्य    बदलसेन्सेक्स   ५२,५८६.८४   (-)३८८.९६निफ्टी       १५,७६३.०५  (-) ९३.००मिडकॅप     २३,०८७.२२           ६६.०८स्मॉलकॅप   २६,७८६.६२     ३६०.७१

टॅग्स :शेअर बाजार