Join us

मायक्रोसॉफ्ट देणार ४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

By admin | Updated: July 8, 2017 00:36 IST

तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टने विक्री आणि विपणन (मार्केटिंग) विभागातील ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून

न्यू यॉर्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टने विक्री आणि विपणन (मार्केटिंग) विभागातील ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश कर्मचारी अमेरिकेबाहेरील आहेत. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने एका ई-मेलद्वारे ही माहिती दिली. ग्राहक आणि भागीदार यांची अधिक चांगली सेवा करता यावी यासाठी कंपनी काही बदल करीत आहे. प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही काही कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन तुमच्या नोकरीचा फेरविचार सुरू आहे, अथवा तुमचे पदच रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्याची प्रक्रिया पार पाडीत आहोत. अन्य कंपन्यांप्रमाणेच आम्ही व्यवसायाचे नियमित मूल्यांकन करीत असतो. गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टने विक्री आणि विपनन विभागाची फेररचना करण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या या विभागात जगभरात ५0 हजार लोक काम करतात. मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी उपाध्यक्ष जडसन अलथॉफ यांनी एक अंतर्गत ई-मेल जारी करून फेररचनेची माहिती दिली होती. आगामी काही वर्षांत मायक्रोसॉफ्टला घवघवीत ४.५ निखर्व डॉलरच्या बाजार संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी या ई-मेलमध्ये म्हटले होते.