मेट्रो रेल्वे ....
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
मेट्रो रेल्वे ....
फोटो आहे...कॅप्शन : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.च्या कार्यालयात जपान मंत्रालयाच्या ट्रेड आणि इंडस्ट्रीज चमूला मेट्रो रेल्वेची माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित.कर्ज देण्याची जपानची तयारी- मेट्रो रेल्वे प्रकल्प : जपानच्या चमूची मेट्रो रेल्वे कार्यालयाला भेटनागपूर : सुमारे ८६८० कोटी रुपये गुंतवणुकीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ४५०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात उभारण्यात येणार आहे. आता या प्रकल्पाला जपानने कर्ज देण्याची तयारी दर्शविली असून जपान मंत्रालयाच्या ट्रेड आणि इंडस्ट्रीज चमूने बुधवारी मेट्रो रेल्वेच्या कार्यालयाला भेट दिली.नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी चमूला प्रकल्पाच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती दिली. चमूमध्ये मासाफुमी किशिदा, किकू टाके, जीन ससाकी, सतोशी इचीनोमिया यांचा समावेश होता. कंपनीच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या कार्याची माहिती देताना हा प्रकल्प डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. जपानच्या चमूने प्रकल्पाला कर्ज आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. ही चमू मेट्रो रेल्वेच्या विस्तृत प्रकल्प अहवालाचा (डीपीआर) अभ्यास करणार आहे. यापूर्वी या प्रकल्पाला फ्रान्स, जर्मनी, युरोपियन डेव्हलपमेंट बँक आणि चीनने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. प्रकल्पासाठी कर्ज स्वरुपात वित्तीय भांडवल गोळा करण्याची तयारी केंद्र सरकारच्या वित्तीय मंत्रालयातर्फे सुरू असून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.