Join us  

देशातील १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल रोजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:25 AM

देशात राहतील १0 राष्ट्रीयीकृत बँका

नवी दिल्ली : देशातील १0 सरकारी बँकांचे विलिनीकरण १ एप्रिल रोजी होण्याची शक्यता असून, त्यामुळे सरकारी बँकांची संख्या केवळ १२ राहील. या विलिनीकरणाची घोषणा ३0 आॅगस्ट रोजी केली होती. याबाबत अधिसूचना या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण होईल आणि इलाहाबाद बँकेचे विलीनीकरण इंडियन बँकेत केले जाईल. युनियन बँकेमध्ये आंध्र बँक व कॉपोर्रेशन बँकेचे विलीनीकरण होणार आहे.

या विलीनीकरणानंतर देशात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक आॅफ महाराष्ट्र व यूको बँक शिल्लक राहतील. याआधी २0१७ साली स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये स्टेट बँक आॅफ पटियाळा, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, तसेच भारतीय महिला बँक विलीन करण्यात आली होती. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र