Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत घरोटे केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सदस्य

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

फोटो स्कॅन

फोटो स्कॅन
नागपूर : संस्कार भारतीचे राष्ट्रीय मंत्री चंद्रकांत घरोटे यांची केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष दिग्दर्शक पहलाज निहलानी आहेत घरोटे गेल्या २५ वर्षापासून ललित कलांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात देशविदेशात विविध कलासंमेलनांचे आयोजन करण्यात आले. नागपुरात अ. भा. कलासाधक संगमात देशातून ५ हजार कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्यांना दिग्दर्शक राजदत्त यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या नियुक्तीचे वैदर्भीयांनी स्वागत केले आहे.