Join us

रेल्वे आणणार मेगा अॅप! सर्व माहिती मिळणार एका क्लिकवर

By admin | Updated: April 23, 2017 19:14 IST

प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. आता प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी एक मेगा अॅप

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 -  प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. आता प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी एक मेगा अॅप सुरू करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. या अॅपवरून रेल्वेसंबंधी महत्त्वपूर्ण माहितीसोबतच टूर पॅकेज आणि टॅक्सीची बुकिंगसुद्धा होणार आहे. रेल्वेकडून येत्या जून महिन्यात हे अॅप सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. 
या अॅपमधून रेल्वे प्रवासासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. हे अॅप रेल्वेच्या सध्याच्या सर्व अॅपवर उपलब्ध असेल.  भारतीय रेल्वेकडून विकसित करण्यात येणाऱ्या या अॅपचे नाव हिंदरेल असण्याची शक्यता आहे. ह्या अॅपवर रेल्वेसंबंधी चौकशी करण्याची संपूर्ण व्यवस्था असेल. त्यामधून ट्रेनच्या आगमन आणि प्रस्थानाची वेळ, प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेनला होणारा उशीर, रद्द गाड्या, आसन व्यवस्था यांची माहिती मिळणार आहे.  
त्यासोबतच या अॅपवरून टॅक्सी, पोर्टस सर्व्हिस, रिटायरिंग रूम हॉटेल, टूर पॅकेज, ई कॅटरिंग आदींचे बुकिंग करता येणार आहे. रेल्वे या सेवा, संबंधित आस्थापनांशी मिळकत वाटणीच्या मॉडेलच्या आधारावर उपलब्ध करून देईल. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी किमान 100 कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.