नवी दिल्ली : औषधांच्या किमती कमी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीने ५० रुपयांहून अधिक एमआरपी असलेल्या सर्व औषधींसाठी विक्रीवर होणाऱ्या नफ्याची (ट्रेड मार्जिन) मर्यादा निश्चित करण्याची शिफारस केली आहे.या समितीने २० ते ५० रुपयांच्या औषधींसाठी या मार्जिनची मर्यादा ४० टक्के ठेवण्याची, तसेच २० रुपयांच्या औषधीसाठी ट्रेड मार्जिन २ ते २० रुपये ठेवण्याची शिफारस केली आहे. जेणेकरून ग्राहकांकडून घेतले जाणारे अधिक ट्रेड मार्जिन नियंत्रित करता येईल. या समितीने दोन रुपयांच्या औषधींसंदर्भात मात्र कोणतीही शिफारस केलेली नाही. घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना औषधींच्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याला व्यापार नफा (ट्रेड मार्जिन) म्हणतात.या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर केंद्रीय रासायनिक आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, औषधींच्या किमती वाजवी ठेवण्याचा सरकारचा मानस आहे.
औषधी विक्री नफ्याची मर्यादा निश्तिच व्हावी
By admin | Updated: March 10, 2016 03:00 IST