Join us

पेन्शनधारकांना वैद्यकीय सुविधा

By admin | Updated: February 22, 2015 23:52 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्या पेन्शन योजनेंतर्गत कर्मचारी राज्य बीमा निगमच्या (ईएसआयसी) माध्यमातून उपचारांचे लाभ द्यायचा विचार करीत आहे

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्या पेन्शन योजनेंतर्गत कर्मचारी राज्य बीमा निगमच्या (ईएसआयसी) माध्यमातून उपचारांचे लाभ द्यायचा विचार करीत आहे. याचा तात्काळ ४६ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळू शकतो. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन आणि ईडीएलआय (एम्प्लॉईज डिपॉझिट लिंकड् इन्शूरन्स) कार्यान्वयन समितीच्या ३० जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत पेन्शनधारकांना उपचारांचे लाभ द्यायचा निर्णय झाला.