ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - भारतातल्या प्रसारमाध्यमे व मनोरंजन क्षेत्राची उलाढाल 14.3 टक्क्यांच्या वार्षिक गतीने वाढत असून, ती 2020 मध्ये 2.26 लाख कोटी रुपयांच्या आसपास असेल असा अंदाज आहे. यामध्ये जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न 99,400 कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. 2015 ते 2020 या कालावधीत टिव्हीवरील जाहिरातींचे उत्पन्न 15 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे तर प्रिंट मीडियातील जाहिरातींचे उत्पन्न 8.6 टक्क्यांच्या गतीने वाढणार आहे. केपीएमजी आणि फिक्कीच्या अहवालानुसार डिजिटल मीडियातील जाहिरातींची वाढ तब्बल 33.5 टक्क्यांनी होण्याची अपेक्षा आहे.
टिव्हीसाठी 2015 हे वर्ष विशेष महत्त्वाचे होते कारण या वर्षी जाहिरातींमध्ये 17 टक्के इतकी उत्साहवर्धक वाढ झाली असे केपीएमजीचे मीडिया व एंटरटेनमेंटचे प्रमुख जेहिल ठक्कर यांनी सांगितले.
2015 ते 2020 या पाच वर्षांत देशातल्या प्रिंट मीडियाची वाढ 7.8 टक्क्यांच्या गतीने होईल तर जाहिरातींचे उत्पन्न 8.6 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.