Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापौर सायक्लोथॉन उत्साहात

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

नाशिक : सुंदर नाशिक हरित नाशिकचा संदेश देत हरितकुंभ अभियानांतर्गत महापौर यतिन वाघ यांनी आयोजित केलेली महापौर सायक्लोथॉन ही नाशिक-त्र्यंबक सायकल फेरी अतिशय उत्साहात पार पडली .

नाशिक : सुंदर नाशिक हरित नाशिकचा संदेश देत हरितकुंभ अभियानांतर्गत महापौर यतिन वाघ यांनी आयोजित केलेली महापौर सायक्लोथॉन ही नाशिक-त्र्यंबक सायकल फेरी अतिशय उत्साहात पार पडली .
महापालिकेच्या राजीव गांधी भवन कार्यालयासमोर महापौरांनी हिरवा झेंडा फ डकवून सायक्लोथॉनचा प्रारंभ केला़ याप्रसंगी व्यासपीठावर विशाल उगले, किरण चव्हाण, नंदू देसाई, राजेंद्र निंबाळते, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, अविनाश खैरनार उपस्थित होते. तत्पूर्वी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सायकलपटूंना पर्यावरण राखण्याची शपथ दिली़ नाशिककरांच्या चांगल्या आरोग्यासाठी नाशिक महापालिकेच्या क्रीडा धोरणाच्या माध्यमातून दरवर्षी महापौर सायक्लोथॉन आयोजित केली जाणार असल्याची घोषणा यावेळी महापौरांनी केली़ नाशिक महापालिकेच्या वतीने हरित कुंभ अभियानाचा प्रसार करण्यासाठी या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद देऊन हरित कुंभ पर्वास सुरु वात केली असल्याचे त्यांनी सांगितले़
महापौर सायक्लोथॉनमध्ये नाशिकमधील सायक्लीस्ट व ईको ड्राईव या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच इतर नाशिककर असे १२९ सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. त्यात १२ वर्षांखालील सहा मुले यांच्यासह दहा महिला, तर ६० वर्षांच्या पुढील सहा प्रौढ नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला़ सहभागी सर्वांनी नाशिक, त्र्यंबक व ब्रšागिरी पर्वतास परिक्र मा असा ७५ कि.मी. सायकलने प्रवास करून नागरिकांना निरोगी राहण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी सायकल चालविण्याचा संदेश दिला. सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेली फेरी दुपारी तीन वाजता संपली.
चौकट
साहिल सायकलचा मानकरी
महापौर सायक्लोथॉनमध्ये सहभागींसाठी डेक्थलॉन या कंपनीतर्फेचिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यामध्ये साहिल ध्यानदान या १२ वर्षाच्या मुलाची चिठ्ठी निघाली़ त्यास स्पोर्ट सायकल भेट देण्यात आली़

फ ोटो क्रमांक - 16पीएचएयू 113
फ ोटो ओळी - महापौर सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करताना महापौर यतिन वाघ़