Join us
Daily Top 2Weekly Top 5

मारुती सुझुकीचे यावर्षी नवी मॉडेल्स

By admin | Updated: August 7, 2015 21:50 IST

देशातील सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया बाजारातील आपले अग्रगण्य स्थान टिकविण्यासाठी चालू आर्थिक

नवी दिल्ली : देशातील सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया बाजारातील आपले अग्रगण्य स्थान टिकविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात नवे मॉडेल बाजारात आणेल. त्यात कॉम्पॅक्ट स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकलही असेल. मारुती सुझुकी इंडियाचा कारखाना गुजरातमध्ये सुरू होणार असून त्यात मूळ कंपनी सुझुकी मोटार कॉर्प गुंतवणूक करील. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव कंपनीच्या २०१४-२०१५ च्या वार्षिक सभेत बोलताना म्हणाले की, २०१५-२०१६ वर्षात कंपनी नवनवी मॉडेल्स बाजारात आणील.