Join us  

मारुतीची कार घेताय? तर चिंता नको, आता घरबसल्याही मिळणार कर्ज

By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 6:21 PM

पाहा काय आहे स्कीम आणि जाणून घ्या कसं मिळेल घरबसल्या कर्ज

ठळक मुद्देऑनलाइन पद्धतीनंच होणार ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणीग्राहकांना कर्जासाठी मिळणार बँका, अन्य वित्तीय कंपन्यांचा पर्याय

जर तुम्ही मारुती सुझुकीचीकार घेण्याचा विचार करत आहात आणि तुमच्यासमोर आर्थिक प्रश्न असेल तर आता अशा ग्राहकांसाठी कंपनीनं एक ऑफर सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki India नं देशबरातील ३० शहरांमध्ये स्मार्ट फायनॅन्स स्किम लाँच केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या २६ पैकी २४ स्टेप्स या डिजिटल पद्धतीनं पार पाडल्या जाणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. पहिल्यांदाच कोणत्या कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी अशाप्रकारची सुविधा सुरू केल्याचा दावाही कंपनीनं केला आहे. मारुती सुझुकीनं सादर केलेल्या या ऑफरनंतर आता ग्राहकांना कार लोनसाठी कोणत्याही निरनिराळ्या वेबसाईट्सवर आणि लेंडर्सवर ऑफर्सची माहिती शोधावी लागणार नाही. तंपनी आपल्या साईटवर ग्राहकांची प्रोफाईल, गरजा आणि राहण्याचं ठिकाण यानुसार अनेक पार्टनर्स आणि लेंडर्सद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कर्जाची माहिती देणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना आता आपल्या गरजेनुसार लोन प्रोडक्ट निवडता येणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नसून केवळ ऑनलाइन पद्धतीनं संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. तसंच या ठिकाणी ग्राहकांना ईएमआय किती भरावा लागेल याचीही माहिती मिळणार आहे. तसंच याद्वारे ग्राकांना रिअल टाईममध्ये आपल्या लोन स्टेटसही तपासता येणार आहे. या सुविधेसाठी मारुती सुझुकीनं १२ कंपन्यांसोबत करार केला आहे. यामध्ये स्टेट बँक, कोटक महिंद्रा प्राईम, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, बँक ऑफ बडोदा, चोलामंडलन फायनॅन्स, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा फायनॅन्स, एयू स्मॉल फायनॅन्स, येस बँक आणि एचडीबी फायनॅन्शिअल सर्विसेसचा समावेश आहे. सध्या ही सेवा ३० शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. 

काय करावं लागेल ?

  • मारुती सुझुकीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
  • ज्या कारसाठी तुम्हाला कर्ज हवं आहे ती कार सिलेक्ट करा. 
  • त्यानंतर कोणत्या कंपनीकडून, बँकेकडून तुम्हाला लोन हवं आहे ते सोयीनुसार सिलेक्ट करा. 
  • आवश्यक ती डॉक्युमेंट्स अपलोड करा. 
  • यानंतर कर्ज देणारी कंपनी, बँक ऑनलाइन पद्धतीनं डॉक्युमेंट्सची पडताळणी करून ऑनलाइनच कर्ज मंजुर करेल.
टॅग्स :मारुती सुझुकीमारुतीस्टेट बँक आॅफ इंडियामहिंद्राआयसीआयसीआय बँककार