Join us

विवाहित प्रेयसीवर हल्ला; तरुणाने स्वत:ला संपविले

By admin | Updated: July 12, 2014 00:12 IST

मुंंबई : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाने विवाहित प्रेयसीवर कटरने अमानुषपणे हल्ला केल्याची घटना कांदिवली येथे घडली. तरुणाने स्वत:वरही कटरने गळ्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

मुंंबई : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाने विवाहित प्रेयसीवर कटरने अमानुषपणे हल्ला केल्याची घटना कांदिवली येथे घडली. तरुणाने स्वत:वरही कटरने गळ्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
कांदिवली पि›म येथील रामचंद्र पडळकर चाळीत नलिनी महाडिक (२८) ही विवाहित महिला आपल्या दोन मुलांसमवेत राहते. याच चाळीत जितेंद्र पाटील (३२) या तरुणाशी तिचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जितेंद्र हा अविवाहित असून, तो कॅमेरामन म्हणून काम करतो. शुक्रवारी सायंकाळी पावणेचारच्या दरम्यान जितेंद्र नलिनीच्या घरी गेला. सोबत आणलेला फरशी कापण्याचा कटर त्याने इलेक्ट्रिक प्लगला जोडला व नलिनीच्या डोक्यासह हातावर व पोटावर चालवला. त्यात ती गंभीर जखमी झाली. या वेळी नलिनीने बचावासाठी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावत आले, जितेंद्रने स्वत:च्या गळ्यावरही कटर चालवला.
शेजार्‍यांनी उपचारासाठी दोघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जितेंद्रला मृत घोषित केले. या हल्ल्यात नलिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र तिची प्रकृती चिंताजनक आहे. नलिनीचा जबाब अजून नोंदविण्यात न आल्याने हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिपती पांढरमिसे यांनी दिली. (प्रतिनिधी)
..............................