Join us  

पाच दिवसांत शेअर बाजारात 4.30 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 9:19 PM

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात लागलेल्या घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्पन्नावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वसूल करण्याची घोषणा करताच मुंबई शेअर बाजारमधील घसरण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये.

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात लागलेल्या घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्पन्नावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वसूल करण्याची घोषणा करताच मुंबई शेअर बाजारमधील घसरण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. मंगळवारी शेअर बाजार उघडताच कोसळला. त्यामुळे अवघ्या काही सेकंदांमध्ये गुंतवणूकदारांना 4.30 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.विशेष म्हणजे ही पडझड अजूनही कायम राहणार असल्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 429.58 अंकांनी आपटून 33,317.20 अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा 14 डिसेंबरनंतरचा नीचांकी बंद ठरला. तसेच ही 6 फेब्रुवारीनंतरची सर्वांत मोठी एकदिवशीय घसरण ठरली आहे. त्यादिवशी सेन्सेक्स 561.22 अंकांनी घसरला होता. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्सने 1,129 अंक गमावले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 109.60 अंकांनी आपटून 10,249.25 अंकांवर बंद झाला.14 फेब्रुवारी रोजी पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यापासून सेन्सेक्स घसरणीला लागला आहे. बँकांच्या समभागांना सर्वाधिक फटका बसला. पीएनबीचा समभाग 2.30 टक्क्यांनी घसरला आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बॅक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, फेडरल बँक आणि येस बँक यांचे समभाग घसरले. गीतांजली जेम्सचा समभाग 52 आठवड्यांच्या नीचांकावर गेला आहे.सेन्सेक्समधील सन फार्मा, एम अँड एम, मारुती सुझुकी, टीसीएस, भारती एअरटेल, एचडीएफसी लि., टाटा मोटर्स, विप्रो, पॉवर ग्रीड, आयटीसी लि., आरआयएल, बजाज ऑटो, एलअँडटी, इन्फोसिस, एचयूएल, डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, ओएनजीसी आणि एनटीपीसी यांचे समभाग घसरले.

 

टॅग्स :शेअर बाजार