गणेशाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST
कुडूस - गणेश उत्सवाच्या तयारीला अवघे दोन दिवस असताना बाजारपेठेत गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व घरगुती गणेश मुर्तीच्या आरास सजावटीचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या खरेदीदारांमुळे बाजारपेठांना खरेदीचा रंग चढला आहे. गर्दीने बाजारपेठा भरगच्च दिसताहेत. मात्र महागाईचे सावट आहे.
गणेशाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज
कुडूस - गणेश उत्सवाच्या तयारीला अवघे दोन दिवस असताना बाजारपेठेत गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व घरगुती गणेश मुर्तीच्या आरास सजावटीचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या खरेदीदारांमुळे बाजारपेठांना खरेदीचा रंग चढला आहे. गर्दीने बाजारपेठा भरगच्च दिसताहेत. मात्र महागाईचे सावट आहे.वाडा तालुक्यात साधारणपणे ३०० ते ३५० च्या वर सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती असतात. याचबरोबर घरगुती गणेशमुर्तींचे प्रमाण मोठे आहे. एकंदरीत या उत्सवाच्या आगमनाबरोबर बाजारात तेजी जाणवते. सर्वांच्याच उत्सवामुळे सजावटीत चढाओढ लागते आणि त्यामुळे खरेदीत कुठलीही काटकसर केली जात नाही. मात्र घरगुती सजावटीत महामागाईमुळे हात आखडता घेतला जातो. असे व्यापार्यांचे मत आहे.बाजारपेठात मोत्यांच्या माळा, विजेच्या रंगबेरंगी माळा, कंठीहार, कथीलमाळ, थर्माकोल माळा, चायनाच्या माळा, दिवे, रंगीत कागद, क्रेप रोल, पताका मुकूट, हार, झुंबरे, कथील ब्रॉल, फुलांच्या माळा, मण्यांची तोरणे अशा वस्तूंची रेलचेल असून त्यांच्या किंमती ५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहेत. खास मोदक आणि अगरबत्ती सुद्धा गणरायासाठी बाजारात आहेत. कुडूस, वाडा प्रमाणेच खानिवली, आबिटघर, कंचाड, शिरिषपाडा गावांतून दुकाने सजली आहेत. वाडा, कुडूसमध्ये गणरायांसाठी थर्माकोलच्या मखरांची दुकाने असून कुडूसमधील जोगमार्गेसर या कामी प्रसिद्ध आहेत. सुंदर पेंटींग केलेली मखरे त्यांच्याकडे मिळतात. मखरांच्या किंमती हजारापासून ५ हजारांपर्यंत आहेत. असे वाड्यातील व्यापार्यांनी सांगितले. सार्वजनिक मंडळांकडून या उत्सवासह सांस्कृतिक कार्यक्रमात विविध स्पधा्र, गायनाचे कार्यक्रम ठेवले जातात. १० दिवस गणेशोत्सवाचे भक्तीमय वातावरण असते........................................................वार्ताहर - अशोक पाटील