Join us

दुसऱ्या दिवशीही बाजारात तेजी

By admin | Updated: March 25, 2017 00:00 IST

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक

मुंबई : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढले.३0 कंपन्यांचा सेन्सेक्स ८९.२४ अंकांनी अथवा 0.३0 टक्क्यांनी वाढून २९,४२१.४0 अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा निफ्टी २१.७0 अंकांनी अथवा 0.२४ टक्क्यांनी वाढून ९,१0८ अंकांवर बंद झाला. बाजार सकाळपासूनच तेजीत असल्याचे दिसून आले. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र दोन्ही निर्देशांक तीन आठवड्यांनंतर प्रथमच घसरले आहेत. या सप्ताहात बीएसई सेन्सेक्स २२७.५९ अंकांनी, तर एनएसई निफ्टी ५२.0५ टक्क्यांनी घसरला.