मुंबई : दिवसभरातील मोठ्या चढ-उतारानंतर शेअर बाजारांनी मंगळवारी सपाट कामिगरीचे प्रदर्शन केले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यानंतर नकारात्मक टापूत गेलेल्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२ पॉइंटांनी वाढून २८,५१६.५९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.४0 टक्क्यांनी वाढून ८,६६0.३0 अंकांवर बंद झाला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी जोरात होता. १0५ अंकांची वाढ नोंदवून तो २८,६४१.0८ अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा जाहीर झाला. रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरांत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे बाजारात अचानक विक्रीचा जोर वाढला. मिळविलेली सर्व वाढ गमावून सेन्सेक्स २८,२७४.३६ अंकांपर्यंत खाली आला. वास्तविक रिझर्व्ह बँकेचे धोरण अपेक्षित असेच होते. तरीही बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचा फटका सेन्सेक्सला बसला. ब्ल्यूचिप कंपन्यांतील खरेदीने सेन्सेक्सला तारले. १२.१३ अंक अथवा 0.0४ टक्क्यांच्या वाढीसह सेन्सेक्स २८,५१६.५९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५0 कंपन्यांवर आधारित एनएसई निफ्टी 0.४0 टक्क्यांनी वाढून ८,६६0.३0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,६९३.६0 आणि ८,५८६.८५ अंकांच्या मध्ये झुलताना दिसून आला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी १६ कंपन्यांचे समभाग वर चढले. १३ कंपन्यांचे समभाग घसरले. आयटीसीचे समभाग स्थिर राहिले. बँकिंग क्षेत्रापैकी अॅक्सिस बँकेचा समभाग सर्वाधिक १.६९ टक्के घसरला. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँकेचा समभाग १.२0 टक्के आणि एसबीआयचा समभाग 0.९७ टक्के घसरला. (वृत्तसंस्था)
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यामुळे बाजार निराश
By admin | Updated: April 7, 2015 23:21 IST