Join us

नफाखोरीमुळे बाजार घसरला

By admin | Updated: September 20, 2014 02:43 IST

सुरुवातीच्या कारभारात चढा राहिलेला मुंबई शेअर बाजार नफावसुलीमुळे अखेरच्या सत्रत 22 अंकांनी घसरून 27,क्9क्.42 अंकांवर बंद झाला.

मुंबई : सुरुवातीच्या कारभारात चढा राहिलेला मुंबई शेअर बाजार नफावसुलीमुळे अखेरच्या सत्रत 22 अंकांनी घसरून 27,क्9क्.42 अंकांवर बंद झाला. पायाभूत क्षेत्र, तेल, वायू, रिअल्टी व वाहन कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाल्यामुळे सेन्सेक्सध्ये घसरण झाली. असे असले तरी सलग सहाव्या आठवडय़ात बाजाराने चढाई कायम ठेवली आहे. मागील दोन वर्षात हे प्रथमच घडत आहे. 
मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअरांचा सेन्सेक्स शुक्रवारी सकारात्मकरीत्या 27,139.39 अंकांवर खुला झाला. दिवसभरात 27,247.17 अंकांर्पयत त्यात वाढही झाली. परंतु नंतर विक्रीचा जोर वाढल्यामुळे ही वाढ कायम न राहता अंक 21.79 ने (क्.क्8टक्के) घसरून 27,क्9क्.42 वर बंद झाला. साप्ताहिक उलाढालीचा विचार करता सेन्सेक्सला 29.37 अंकांचा लाभ झाला. मागील दोन सत्रंमध्ये 619.7क् अंकांची (2.34 टक्के) वाढ नोंदवण्यात आली होती. 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (निफ्टी) 6.7क् अंकांची (क्.क्8 टक्के) किरकोळ वाढ नोंदवली. हा अंक 8,121.45 वर बंद झाला.