Join us

सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलीकरणात ५३,८८६ कोटी रुपयांनी घट

By admin | Updated: September 28, 2015 01:55 IST

शेअर बाजाराचा निर्देशांक घसरल्यामुळे गेल्या आठवड्यात बीएसईच्या शीर्ष १० कंपन्यांच्या बाजार भांडवलीकरणात (एमकॅप) एकूण ५३,८८५.९० कोटी रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.

नवी दिल्ली : शेअर बाजाराचा निर्देशांक घसरल्यामुळे गेल्या आठवड्यात बीएसईच्या शीर्ष १० कंपन्यांच्या बाजार भांडवलीकरणात (एमकॅप) एकूण ५३,८८५.९० कोटी रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. बीएसईवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, या काळात पेट्रोलियमसह विविध क्षेत्रात व्यापार करणारी दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा एमकॅप सर्वात जास्त १८,५२३.८० कोटी रुपये घसरून २,७१,३४७.८४ कोटी रुपयांवर आला. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इम्फोसिसच्या बाजारतील भांडवलात सर्वात जास्त ८४१८.३० कोटी रुपयांची वाढ होऊन ते २,६२,१७३.५१ कोटींवर पोहोचले. कोळसा खनन क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) चा एमकॅप १५,४४३.५१ कोटी रुपये कमी होऊन तो २,०१,२३९.३७ कोटींवर आला. त्याचप्रमाणे ओएनजीसीचा एमकॅप ९५८२.१४ कोटी रुपयांनी घसरून १,९४,५५१.८५ कोटी, एचडीएफसीचा ४५९४.३९ कोटींनी घसरून १,८६,२७४.२८ कोटी, सन फार्माचा ३३२०.८८ कोटींनी घसरून २,१४,४८५.६७ कोटी आणि भारतीय स्टेट बँकेचा २४२१.१८ कोटींनी कमी होऊन १,८०,९४६.१ कोटी रुपयांवर आला आहे. याउलट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवलीकरण ४२०१.४७ कोटींनी वाढून ते ५,०४,४८९.९८ कोटींवर पोहोचले. तर आयटीसीचे ३४२९.०२ कोटींनी वाढून २,५८,९७४.८६ कोटींवर आणि एचडीएफसी बँकेचे ६३५.५८ कोटींनी वाढून २,६४,४८५.८३ कोटींवर पोहोचले आहे. (वृत्तसंस्था)