Join us  

मार्केट A 2 Z : संधी सोडाल तर पश्चाताप करीत बसाल!

By पुष्कर कुलकर्णी | Published: January 02, 2023 10:44 AM

कोरोनामुळे जागतिक शेअर बाजारात अभूतपूर्ण विक्रीचा मारा झाला आणि सर्वच बाजार एकतर्फा खाली आले.

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी अनेकदा संधी येत असते आणि ती चाणाक्ष गुंतवणूकदार हेरीत असतात. किंबहुना त्यासाठी दबा धरूनच बसलेले असतात. मार्च / एप्रिल २०२० मध्ये अशी संधी गुंतवणूकदारांना मिळाली होती. कोरोनामुळे जागतिक शेअर बाजारात अभूतपूर्ण विक्रीचा मारा झाला आणि सर्वच बाजार एकतर्फा खाली आले. त्या वेळेस ज्या गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खाली आलेल्या भावात गुंतवणूक केली असेल त्यांना पुढील दीड- दोन वर्षात दुप्पट/तिप्पट/ चौपटही  रिटर्न्स मिळाले आहेत. तसेच, जे न घाबरता बाजारात तग धरून राहिले त्यांची संपत्तीही वाढली. त्यामुळे बाजारात गुंतवणुकीची योग्य संधी हरणे ही एक कला आहे. अशी संधी सोडली तर पश्चाताप नक्कीच होतो. म्हणूनच म्हणतात की Opportunity Never Comes Twice. आज इंग्रजी अक्षर O पासून सुरू होणाऱ्या एका चांगल्या कंपनी विषयी...

ओबेरॉय रिअलिटी लि. (OBEROIRLTY) रिअलिटी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी. रिअलिटीमध्ये रहिवासी संकुले आणि व्यावसायिक जागा बांधून विक्री करणे आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये हॉटेल व्यवस्थापन हे प्रमुख व्यवसाय.  फेस व्हॅल्यू : रुपये १०/-सध्याचा भाव : रु. ८६५.१४/-मार्केट कॅप :  ३० हजार कोटी रुपये.भाव पातळी : वार्षिक हाय रु. १,०८९/- आणि लो - ७२६/-बोनस शेअर्स : अद्याप नाही.शेअर स्प्लिट : अद्याप नाही.रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत तिप्पट रिटर्न्स दिले आहेत.डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जाताे.मागील डिव्हिडंड : रुपये ३/- प्रति शेअर.

भविष्यात संधी : भारतात रिॲलिटी आणि हॉस्पिटॅलिटी ही दोनही क्षेत्रांत भविष्यात प्रगती आहे. त्यामुळे या कंपनीसही व्यवसायवाढीसाठी संधी आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर दिले नाहीत तसेच शेअर स्प्लिट केलेला नाहीये. तीही संधी आहेच. 

टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

टॅग्स :शेअर बाजार