Join us

अनेकांना वारसाहक्काने मिळाली स्वीस खाती!

By admin | Updated: November 6, 2014 02:39 IST

स्वीत्झर्लंडकडून भारताने तेथील बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या कथित काळ्या पैशांचा हिशोब मागितला आहे.

नवी दिल्ली : विदेशात जमा असलेल्या कथित बेहिशोबी पैशांच्या चौकशीत काही कुटुंबियांना वारसाने मिळालेला किंवा पूर्वीच स्थापन झालेल्या विश्वस्त मंडळांकडून, तसेच कंपन्यांकडून मिळालेल्या पैशांचा मुद्दा अनेकांच्या संदर्भात समोर आलाआहे.दरम्यान, स्वीत्झर्लंडकडून भारताने तेथील बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या कथित काळ्या पैशांचा हिशोब मागितला आहे. एचएसबीसी बँकेच्या स्वीत्झर्लंड शाखेत व इतर विदेशी बँकांमध्ये बेहिशोबी पैसा जमा केल्याचा संशय असलेल्या शेकडो संस्थांची व व्यक्तींची सध्या चौकशी सुरू आहे. यात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या ६२७ नावांचाही समावेश आहे. स्वीत्झर्लंडने भारताने या प्रकरणी तात्काळ सहकार्य व सूचनांसाठी केलेल्या आग्रहामुळे विशिष्ट वेळेत कारवाई करण्याचे आश्वासन त्याला दिले आहे. अशा प्रकरणांची भारतीय अधिकारी स्वीत्झर्लंड सरकारशी संपर्क साधण्याआधी चौकशी करीत आहेत. भारत सरकारने वेगवेगळ्या मार्गांनी मिळालेल्या नावांची चौकशी सुरू केल्यानंतर अशी बरीच नावे समोर आली आहेत की, त्यांना त्यांचे नातेवाईक किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून, तसेच सक्रिय नसलेली विश्वस्त मंडळे, कंपन्यांकडून वारसाने हा पैसा मिळाला आहे. या नावांमध्ये एचएसबीसीशी संबंधित यादीही आहे. ही यादी फ्रान्स सरकारकडून मिळाली होती. वारसाने मिळालेल्या खात्यांची संख्या किती, हे निश्चित होऊ शकलेले नाही; पण भारत सरकारने यातील काही खात्यांचा तपशील स्वीत्झर्लंड सरकारकडे मागितला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)